१८ एप्रिल ला सर्च रुग्णालयात कर्करोग (कॅन्सर), मधुमेह (डायबेटीस/शुगर) व अस्थिरोग विकार आरोग्य तपासणी शिबीर

61

-नागपुर येथील विशेषज्ञ डॉक्टर्स करतील आरोग्य तपासणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात उद्या गुरुवार१८ एप्रिल २०२४ रोजी कर्करोग (कॅन्सर) ओपीडी, मधुमेह (डायबेटीस/शुगर) व अस्थिरोग विकार ओपीडी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन कर्करोगावर उपचार घेणे महागडे ठरते. गरीब व गरजूंवर जवळच्या भागात रोगाचे निदान व ऊपचार करता यावे, याकरिता नागपुरचे कर्करोग तज्ञ डॉ.सुशील मांनधनिया सर्च रुग्णालय चातगाव येथे तापसणी करिता येणार आहेत.
स्तनांचा रंग बदलणे, स्तन लटकणे, गाठ येणे किंवा आकार बदलणे ही सर्व स्तंनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. श्वास लागणे अशक्तपाणा आणि थकवा जाणवणे, स्नायू आणि हाडे दुखणे ही सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. तोंडात सूज किंवा गाठ येणे, तोंडात रक्त स्त्राव होणे, तोंडाच्या आतील भागात लाल किंवा पांढरे ठिपके दिसून येणे ही तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. तसेच योनीतील असामान्य रक्तस्त्राव, मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती (स्त्रियांच्या जीवनातील मासिकपाळी बंद होतो तो काळ) नंतरही योंनीतून रक्तस्त्राव, पेल्विक वेदना (ओटीपोटातील दुखणे), असामान्य योनीस्त्राव (रक्तरंजीत, पिवळा), वजन कमी होणे, वेदनादायक लैंगिक संभोग ही गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे असल्यास कर्करोग ओपीडी मध्ये तपासणी करण्यात येईल.
खूप तहान लागणे, नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होणे, विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त थकवा जाणवणे, प्रयत्न न करताही वजन कमी होणे, सारखे काही इन्फेक्शन होणे, दृष्टी कमी होणे, कापलेल्या किंवा इतर जखमा लवकर न भरणे ही मधुमेहाच्या आजाराची लक्षणे आहेत. ज्या रुग्णांची रक्तातील साखर(शुगर) वाढलेली आहे. अशी लक्षणे आढळल्यास मधुमेह आजार ओपीडी मध्ये मधुमेह विकारतज्ञ डॉ. संकेत पेंडसे नागपुर तपासणी करतील. येताना आपले जुने रिपोर्ट्स व शुगर तपासणीसाठी उपाशीपोटी यावे.
अस्थिरोग आजाराची अनेक लक्षणे आहेत जसे पायात आणि हातात पसरणार्‍या वेदना, संधिवात, नसांचे त्रास, मान दुखणे, पाठदुखी, स्पाँडीलिसिस, स्लिप डिस्क, मणक्याचे आजार, पाठीच्या कण्यातील व्यंग, पायात व हातात व्यंग येणे व गुडघेदुखी, हाडांचे फ्रॅक्चर ही लक्षणे असल्यास रुग्णांनी या ओपीडीमध्ये उपचार सुविधा घ्यावी. सुप्रसिद्ध अस्थिविकार तज्ञ (आर्थोपेडिक सर्जन) डॉ.आकाश सावजी नागपुर रुग्णांची आरोग्य तपासणी करतील.
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी रुग्णांकरिता सर्च रुग्णालय विशेषज्ञ ओपीडी सुविधा प्रदान करीत आहे, कर्करोग (कॅन्सर), मधुमेह (डायबेटीस/शुगर) व अस्थिरोग विकार ओपीडी ही दर महिन्याच्या तिसर्‍या गुरुवारलला नियोजित असून १८ एप्रिलला जास्तीत जास्त रुग्णांनी रुग्णालयात येऊन आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्च रुग्णालय करीत आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.
(#thegdv #muktipath #gadchirolinews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here