आरमोरी जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेत शताब्दी महोत्सवाचे आयोजन

225

– ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन
The गडविश्व
ता.प्र. / आरमोरी (नरेश ढोरे) : स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेली आरमोरी येथील जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेला १०० वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून शाळेचा शताब्दी महोत्सव ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान साजरी करण्यात येत आहे.
जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेची स्थापना सन १९२३ साली झाली. यंदा या शाळेला १०० वर्ष पूर्ण होत आहे. या शाळेतून अनेक विद्यार्थी घडले असून वेगवेगळ्या ठिकाणी आज कर्त्यव्यावर आहेत. शाळेला १०० वर्ष पुनः होत असल्याने त्यानिमित्ताने शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी अर्थात प्राथमिक शाळेतील आठवणींचा स्मृतिगंध उधळण्यासाठी.माजी विद्यार्थी स्नेहमीलन सोहळ्याचे आयोजन ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या सोहळ्यात सामील होऊण सोहळा अधिक रंगतदार करण्यासाठी उपस्थित राहुन शताब्दी महोत्सव द्विगुणित करावा असे आवाहन महोत्सव आयोजन समीतीने केले आहे.

बाहेरगावी असलेले माजी विद्यार्थी ह्या सोहळ्यात सहभागी होऊ शकतील याकरिता व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असून पुढील लिंक च्या आधारे ग्रुप मध्ये जॉईन होता येणार आहे. आयोजनाची पुढील रूपरेषा याच गृपवर प्राप्त होणार आहे असेही महोत्सव आयोजन समीतीने कळविले आहे.

https://chat.whatsapp.com/KC4aQu9kBPfDsrtD7SFPSk

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here