५० लिटर दारू व ६ ड्रम गुळाचा सडवा नष्ट

32

The गडविश्व
गडचिरोली, २३ जानेवारी : सिरोंचा तालुक्यातील गुमलकोंडा व सोमनूर येथे अहिंसक कृती करीत ५० लिटर दारु व सहा ड्रम गुळाचा सडवा संबंधित गावातील गाव संघटनेच्या महिला व मुक्तीपथ तालुका चमूने नष्ट केले .
गुमलकोंडा गावात तीन विक्रेते आहेत. एका विक्रेत्याने छत्तीसगड राज्यातून दारू आणून चोरट्या मार्गाने विक्री करित असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे मुक्तीपथ व गाव संघटनेने संयुक्तरीत्या परिसराची पाहणी केली असता , दारू आढळून आली. संबंधित विक्रेत्याची ५० लिटर गुळाची दारू नष्ट केली व पुन्हा दारूविक्री करतांना आढळून आल्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याची तंबी देण्यात आली. दुसरी कृती सोमनूर गावात गाव संघटनेच्या महिला व मुक्तीपथ तालुका चमूने केली. अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्याच्या घरात आढळून आलेला सहा ड्रम गुळाचा सडवा नष्ट करण्यात आला.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Netaji birthday 2023) (HUR vs SIX) (Norovirus) (KL Rahul Wedding) (IND vs NZ 3rd ODI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here