The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २८ : तालुक्यातील रांगी पि.एम.श्री. जी. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थी अनुज जांगी याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवत नवोदय विद्यालय, घोटसाठी निवड मिळवली आहे.
नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अनुजच्या यशाने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ठुमराज कुकडकार, माजी समिती अध्यक्ष नरेंद्र भुरसे, केंद्रप्रमुख प्रकाश अवसरे, मुख्याध्यापक अंजुम शेख यांच्यासह शाळेतील शिक्षक व गावकऱ्यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
अनुजने आपल्या यशाचे श्रेय वडील, आई आणि गुरुजनांना दिले आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

#thegadvishva #thegdv #gadchirolipolice #gadchirolinews #navoday #murumgav #dhanora