कोरची शहरातील पानठेला धारकांनी पाळला तंबाखूविरोधी दिन

60

-तंबाखूमुक्तीची घेतली शपथ
The गडविश्व
गडचिरोली, ३ जून : कोरची शरहातील पानठेला धारकांनी ३१ मे ला आपला व्यवसाय बंद ठेवून जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला. या निमीत्त मुख्य चौकात कार्यक्रमाचे आयोजन करून तहसीलदार गणेश सोनवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली.
शहरातील पानठेले धारक, किराना असोशीयशन, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, नागरीक, शहरसंघटना व शहरातील जनतेच्या माध्यमातुन ३१ मे जागतीक तंबाखु विरोध दिनानिमित्त बसस्टॉप चौकात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून पानठेला धारक संघटनेने आपले पानठेले बंद सहकार्य केले. कार्यक्रमाला तहसीलदार गणेश सोनवानी, पोलिस स्टेशनचे गणेश फुलकवर, किराना असोशिएशन अध्यक्ष नितीन रहेजा, पानठेला संघटना अध्यक्ष गुलाब भैसारे, गजेंद्र पटेल, संजय सोरते, महेश टेंभुर्णे, आनंदराव हलामी, योगीराज बगमारे, प्रकाश कोचे, बँक व्यवस्थापक संदीप ईंदुरकर संतोष जाधव, मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.

(the gdv, the gadvishva, muktipath, gadchiroli news, korchi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here