मानीव अकृषिक असलेल्या सर्व प्रकरणांचे चलन पाठविणे व पैसे भरणा करुन सनद देण्याची परवानगी तहसीलदारांना

119

The गडविश्व
गडचिरोली, ११ ऑगस्ट : महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचे परिपत्रकान्वये, महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 कलम 42 (ब), 42 (क) व 42 (ड) समाविष्ट केल्यानंतर जमिन मालकांना पुर्वीच्या बिनशेती परवानगीसाठी लागणारे विविध विभागाचे नाहरकत दाखले, त्यामध्ये होणारा कालापव्यय कमी होऊन जमिन मालकांनी अकृषिक आकार/रुपांतरण कर इत्यादी रक्कम भरल्यानंतर त्यांना सनद देण्यासाठी, महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 कलम 42 (ब), 42 (क) व 42 (ड) च्या सुलभ कार्यपद्धतीचा सर्व संबंधित जमिन मालकांनी लाभ घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांचे तहसिलदार यांना सनद देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे.
त्याअन्वये गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तहसिल अंतर्गत पात्र मानीव अकृषिक प्रकरणांची एकूण संख्या 14259 असुन सर्व जमिन धारकांना प्रकरणांचे चलन पाठविलेले असून महसूल जमा करुन सनद प्राप्त करुन घेणाऱ्या जमिन धारकांची संख्या अत्यंत अल्प असुन फक्त 612 जमिन धारकांनी महसूल जमा करुन सनद प्राप्त केलेली आहे. करीता उर्वरीत 13647 पात्र जमिन धारकांनी महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या उक्त सेवेचा लाभ घेवून अकृषिक सनद प्राप्त करुन घ्यावी असे जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here