दारू तंबाखूमुक्त शाळा व गाव प्रकल्प सादरीकरण स्पर्धा : जिमलगट्टा आश्रमशाळा तालुकास्तरावर प्रथम

437

– अहेरी तालुकास्तरावर प्रथम
The गडविश्व
गडचिरोली, २५ फेब्रुवारी : अहेरी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत तालुकापातळी दारू तंबाखूमुक्त शाळा व गाव प्रकल्प सादरीकरण स्पर्धा कार्यक्रम घेण्यात आला. यात जीमलगट्टा शासकीय आश्रम शाळेने प्रथम क्रमांक तर छल्लेवाडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र विशेष तज्ञ पि. यू. मानकर होते. परीक्षक म्हणून गटसाधन केंद्र गट समन्वयक ताराचंद भोपाळ भूरसे, उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथिल समुपदेशक गोपाल रंजन कोडापे उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत अहेरी तालुक्यातील जिप च्या शाळांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात केंद्रस्तरावर निवड झालेल्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पोस्टर, गीत गायन, पथनाट्य सादर करून व्यसनाचे दुष्परिणाम योग्यप्रकारे पटवून दिले. तिसऱ्या टप्प्यातील तालुकास्तरीय स्पर्धेत राजमाता राजकुवाबाई माध्यमिक आश्रम शाळा मोदूमडूगु, शासकीय आश्रम शाळा पेरमिली, शासकीय आश्रम शाळा खमनचेरु, शासकीय आश्रम शाळा जिमलगट्टा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजाराम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मद्दीगुडम या शाळांची निवड करण्यात आली. दरम्यान, आमची शाळा तंबाखुमुक्त शाळा, दारु व तंबाखु विक्री बंदी गाव कस करणार या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. निरीक्षकांनी योग्य मूल्यांकन करून जीमलगट्टा शासकीय आश्रम शाळेला प्रथम तर छल्लेवाडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला द्वितीय क्रमांक दिला.
या कार्यक्रमांमध्ये समन्वयक शिक्षक वि एस. बोपनवार, वी.जी. मडावी, ए. एम. भुतांगे, ए.एस. पोटे, एस. एन. जुमनाके, एस. एन. मेडी, बी. बी. कोडापे, के. डब्ल्यू. वेलादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन मुक्तीपथ तालुका प्रेरक आनंदराव कुम्मारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पार्क कार्यकर्ता स्वप्निल बावणे यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना जेवण, बिस्कीट, चाय, जिलेबीचे व्यवस्था मुक्तिपथ अभियानकडून करण्यात आले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (Vinay Gowda) (National Commission for Scheduled Tribes) (Maharashtra DGP Rajnish Seth) (Municipal Corporation of Delhi) (Women’s World Cup) (Sergio Ramos) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here