व्हॉईस ऑफ मीडियाची अहेरी तालुका कार्यकारिणी गठित

172

– तालुकाध्यक्ष पदी मिलिंद खोंड तर सचिव पदी पंकज नौनुरवर व कार्याध्यक्ष पदी अशोक पागे यांची निवड
The गडविश्व
अहेरी,दि.१६ : व्हॉईस ऑफ मीडिया ही तीन लाखांहून अधिक सदस्य संख्या असलेली देशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. विविध विंगच्या माध्यमातुन पत्रकारिता आणि पत्रकार यांच्या हितासाठी झटणाऱ्या गडचिरोली व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या अहेरी तालुकाध्यक्षपदी पत्रकार मिलिंद खोंड, सचिव पदी पंकज नौनुरवार तर कार्याध्यक्षपदी अशोक पागे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, राज्याचे कार्याध्यक्ष मंगेश खाटीक यांच्या मार्गदर्शनात व्हॉईस ऑफ मीडिया गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार व राज्य कार्यकारणी सदस्य मुकुंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मिलिंद खोंड यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
रविवार १६ फेब्रुवारी रोजी आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विश्राम गृहात व्हॉईस ऑफ मीडिया अहेरी तालुका कार्यकारणी निवड सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश दुडमवार व प्रमुख उपस्थिती राज्य कार्यकारणी सदस्य मुकुंद जोशी हे होते. तर राज्य कार्याध्यक्ष मंगेश खाटीक यांनी ऑनलाइन वर नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्य गण यांना मोलाचे मार्गदर्शन दिले.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया अहेरी तालुकास्तरीय कार्यकारिणी गठित करण्यात आली असून मिलिंद खोंड तालुकाध्यक्ष म्हणुन नियुक्त करण्यात आले.तर सचिव पंकज नौनुरवार, कार्याध्यक्ष अशोक पागे, सुनील तुरकर, उपाध्यक्ष रमेश बामनकर, अखिल कोलपकवार , सहसचिव आशिष सूनतकर, प्रसिद्धी प्रमुख विजय सूनतकर, कार्यवाहक अमोल कोलपकवार रफिक पठाण, सदस्य विस्तारी गंगाधरीवार,उमेश पेंड्याला, रामू
मादेशी, आनंद दहागावकर आदींच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर कार्यकारिणी गठित करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे गडचिरोली जिल्हाअध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांनी पत्रकारांना विविध सोयी कशाप्रकारे उपलब्ध होतील यासाठी प्रयत्नशील आहोत. सर्व पत्रकारांनी एकजुटीने एकोपा राहून व्हाईस ऑफ मीडियाशी संलग्न रहावे. कार्यकारणीत नवीन पत्रकारांना समाविष्ट करावे. जेणेकरून त्यांना पुढील भविष्यासाठी अनेक सोयी उपलब्ध होतील असे माहिती व मार्गदर्शन लाभले.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here