The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १६ : गोर बंजारा समाज शिवणी तांडा यांचा वतीने शनिवार १५ फेब्रूवारी रोजी दुपारी ३ ते सांयकाळी ६ वाजतादरम्यान संत सेवालाल महाराज यांचा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात बंजारा समाजाचे महिला भगिनी, लहान मुली आपल्या पारंपरिक विशिष्ट वेशभूषेत नृत्य तसेच विविध बोली भाषेत पारंपारिक गायनातून आपल्या बंजारा संस्कृतिचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज यांचा प्रतिमेचे पूजन करीत करण्यात आली. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी भाजपा अनुसूचित जाति मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड उमेश वालदे होते तर उदघाटक प्राचार्य उमाताई चंदेल होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा मंजूळाताई मारगाये, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजू बावनथळे, वाहतूक निरीक्षक राजेश राठोड, सूधाकर राठोड, सिराज पठान ग्रामपंचायत सदस्य ज्योती कापगते, निर्मला गावळ, गोवर्धन सोरी, खूशाल मारगाये, बोधनजी मूळे, कारभारी अजय राठोड, राजू नूनसावत बंजारा समाजाचे नायक विजय मूळे संचालन आसाराम मुळे, तसेच समाज बांधव मोठ्या संख्येत हजर होते.
यावेळी मार्गदर्शन करताना संताचा विचारांचा पगळा बालमनावर झाल्यास भावी पिढी वाममार्गावर जाणार नाही, संताचा विचारावर तो मार्गक्रमन करीत भविष्य घडवेल जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात महापूरषांचा विचारांची ओळख नव्या पीढीला होते असे प्रतिपादन ॲड उमेश वालदे यांनी केले. तर आपल्या समाजाची ओळख टिकवून ठेवण्याकरीता समाजाची परंपरा संस्कृतीचे जतन करने आवश्यक असल्याचे प्राचार्य उमा चंदेल यानी सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार आसाराम मुळे यांनी केले.
