– वनविभागाचे प्रशासकीय अधिकारी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्काप्रती उदासीन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : शासनाच्या विविध विभागामध्ये एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्यात येत आहे परंतु वनविभाग मात्र या सवलतीचा योग्यरित्या लाभ आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात टाळाटाळ करीत आहे. वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नागपूर महाराष्ट्र राज्य, शाखा गडचिरोली वनविभाग च्या माध्यमातुन वेळोवेळी विभागीय कार्यालय गडचिरोली यांचेकडे एकस्तर पदोन्नतीच्या चेतनश्रेणी बाबत (वनरक्षक पदाचे वनपाल पदाच्या वेतनश्रेणी बाबत) निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटी देऊन कार्यालयास विनंती करीत आहे परंतु विभागीय कार्यालयातील क्षेत्रीय वनकर्मचारी हे रानावनात कोणत्याही मनुष्यबळाशिवाय कर्तव्य बजावणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे एकस्तर वेतनश्रेणी बाबतचे मागणीचे कुठल्याही प्रकारची आजतागायत कार्यवाही केलेली नाही त्यामुळे वनविभागाचे प्रशासकीय अधिकारी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्काप्रती उदासीन असल्याचे दिसून येत असून विविध
मागण्यांसाठी १७ फेब्रुवारी २०२५ पासून वनविभाग, गडचिरोली यांचे कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा प्रसिद्धीपत्रकातून वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर महाराष्ट्र राज्य, शाखा गडचिरोली वनविभागाच्या वतीने देण्यात आला आहे.प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील अतिशय मागास व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणुन ओळखला जातो. शासन या जिल्हयाच्या विकासाकरीता कटीबध्द असुन प्रशासनाच्या माध्यमातुन शासकीय योजना जनसामान्यापर्यंत प्रभाविपणे पोहचविण्याकरीता प्रयत्नशील आहे. या योजना प्रभाविपणे कार्यान्वीत करण्याची जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्यांची आहे. करीता शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष कृती कार्यक्रमा अंतर्गत शासन निर्णय क्रमांक टिआरएफ 2000/प्र.क्र.3/012 दिनांक 6 ऑगस्ट, 2002 नुसार ‘एकस्तर पदोन्नती’ ची सवलत देऊ केली आहे. त्यानुसार या जिल्हयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांनी धारण केलेल्या पदाच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देऊ केलेली आहे.
जिल्हापरिषद, कृषी विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग या ठिकाणी एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्यात येत आहे परंतु वनविभाग मात्र या सवलतीचा योग्यरित्या लाभ आपले कर्मचाऱ्यांना देण्यात टाळाटाळ करीत आहे. वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नागपूर महाराष्ट्र राज्य, शाखा गडचिरोली वनविभाग च्या माध्यमातुन वेळोवेळी विभागीय कार्यालय गडचिरोली यांचेकडे एकस्तर पदोन्नतीच्या चेतनश्रेणी बाबत (वनरक्षक पदाचे वनपाल पदाच्या वेतनश्रेणी बाबत) निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटी देऊन कार्यालयास विनंती करीत आहे परंतु विभागीय कार्यालयातील क्षेत्रीय वनकर्मचारी हे रानावनात कोणत्याही मनुष्यबळाशिवाय कर्तव्य बजावणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे एकस्तर वेतनश्रेणी बाबतचे मागणीचे कुठल्याही प्रकारची आजतागायत कार्यवाही केलेली नाही.
शासन निर्णय 29.02.2024 अन्वये दि. 06 ऑगस्ट, 2002 च्या एकस्तर पदोन्नती संदर्भात स्पष्टीकरणात्मक सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार संघटनेने विभागीय कार्यालयास योग्यरित्या एकस्तर पदोन्नतीची वेतनश्रेणी लागू करणेबाबत पाठपुरावा केला असता असंवेदनशिल अधिकारी यांनी संघटनेच्या विनंतीला केराची टोपली दाखविलेली आहे. यावरुन वनविभागाचे प्रशासकीय अधिकारी हे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्काप्रती कमालीची उदासीन दिसुन येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाप्रती असंतोष निर्माण झालेला आहे. गडचिरोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गडचिरोलीतील इतर विभाग ज्याप्रमाणे एकस्तर पदोन्नतीचा लाभ देत आहे त्याचप्रमाणे आम्हालाही न्याय मिळावा याकरिता वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर महाराष्ट्र राज्य, शाखा गडचिरोली वनविभाग च्या वतीने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गडचिरोली वनविभाग, गडचिरोली यांचे कार्यालयासमोर १७ फेब्रुवारी २०२५ पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे असा अशी माहितीही देण्यात संघटनेचे अध्यक्ष अनंते ठाकरे, सचिव गुरुनाथ वाढई, कार्याध्यक्ष गडचिरोली वनविभाग राजेंद्र कोडापे, विजय घोळवे उपाध्यक्ष गडचिरोली वनविभाग यांनी दिली आहे.
