-५२ रुग्णांनी घेतला उपचार
The गडविश्व
गडचिरोली, १० जानेवारी : दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम दिसताच विवीध तालुक्यातील एकूण ५२ रुग्णांनी आपल्या तालुका मुख्यालयातील मुक्तिपथच्या क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला.
दारूचे व्यसन लागताच ते सोडण्यासाठी उपचार घेतला पाहिजे. पूर्वी गडचिरोली सारख्या अतिमागास, दुर्गम भागात वसलेल्या जिल्ह्यात या उपचाराची सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण अधिकचे पैसे मोजून मोठ्या शहरात जाऊन उपचार घेत असत. ही गरज लक्षात घेत मुक्तिपथ अभियानाच्या वतीने प्रत्येक तालुका पातळीवर व्यसन उपचार क्लिनिकची सुरवात करण्यात आली. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला आहे. आठवड्यातील नियोजित दिवशी १२ ही तालुक्यात क्लिनिक घेतल्या जाते. बुधवारी धानोरा १४, देसाईगंज ११, भामरागड ७, गुरुवारी एटपल्ली १२ तर शुक्रवारी चामोर्शी क्लिनिकचा ८ रुग्णांनी लाभ घेतला. अशा एकूण ५२ रुग्णांवर उपचार करण्यात आला.
विशेष म्हणजे, या रुग्णांची केस हिष्ट्री घेत त्यांना समुपदेशन देखील करण्यात आले. यात दारूचे दुष्परिणाम, धोक्याचे घटक, शरीरात होणारा बदल आदींची माहिती देत नियमित औषधोपचार करण्याचा सल्ला देण्यात आला. सोबतच तुमच्या कुटुंबातील, शेजारी मद्यपी रुग्णांना देखील उपचार घेण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले.
(The Gadvishava) (Gadchiroli News) (Oxford utd vs Arsenal) (CA Final Result) (Chanda Kochhar) (TCS share Price) (GATE 2023 Admit Card) (Sajid Khan) (Delhi School news) (Man City vs Chelsea) (Sports) (Atlético Madrid vs Barcelona)