गडचिरोली : जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप

901

– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, ९ जानेवारी : कुऱ्हाडीने वार करत जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी सोमवार ९ जानेवारी रोजी ठोठावली आहे.
येसु रैनु नरोटे (२९) रा. हालेवारा ता. एटापल्ली जि.गडचिरोली असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
मृतक कुम्मी रेनु नरोटे (४५) रा. हालेवारा ता. एटापल्ली हिचा सावत्र मुलगा आरोपी येसु रेनू नरोटे रा. हालेवारा हा ११ जानेवारी २०१९ च्या रात्री ०८.०० वा. च्या दरम्यान फिर्यादी रामा रैनु नरोटे यास तंबाकु दे असे म्हणाला असता फिर्यादी ने तम्बाकु नाही असे म्हणाल्या वरुन फिर्यादी च्या अंगावर धावून येउन धक्काबुक्की केली तेव्हा आरोपी ची सावत्र आई कुम्मी रेनू नरोटे ही भांडण सोडवण्यास आली असता आरोपी येसु रेनु नरोटे याने जवळ असलेल्या कुऱ्हाडीने त्याच्या सावत्र आई कुम्मी नरोटेच्या डोक्यावर, मानेवर वार करून गंभीर दुखापत केली. दरम्यान ग्रामीण रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारासाठी भरती केले असता २१ जानेवारी २०१९ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१२ जानेवारी २०१९ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे फिर्यादी रामा रेनु नरोटे यांनी दिलेला तक्रारी वरुन आरोपी विरोधात उप पोस्टे कसनसुर अप.क्र. ०१/२०१९ कलम ३०७ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर कलम ३०२ भादवी वाढविण्यात आले.
सदर प्रकरणात पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून आज सोमवार ०९ जानेवारी २०२३ रोजी आरोपी येसु रैनु नरोटे (२९) रा. हालेवारा ता. एटापल्ली याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल, गडचिरोली यांनी कलम ३०२ भादवी मध्ये जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोउपनि महेश के. चिटमपल्ले, पोमके हालेवारा यांनी केला आहे. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.

(The Gadvishva) ( Gadchiroli News Updates) (Selection of three athletes from Gadchiroli district for Mini Olympic Games) (The Gadvishava) (Gadchiroli News) (Sports) (Liverpool vs Wolves) (Serie A) (Odisha FC) (Liverpool FC) (Tiger gadchiroli)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here