गडचिरोली शहरात बचत गटाच्या नावाखाली सुरू होती अवैध सावकारी ; सहकार विभागाची धाड

914

– आक्षेपार्ह कागदपत्र जप्त
The गडविश्व
गडचिरोली, ९ जानेवारी : शहरात बचत गटाच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध सावकारी वर सहकार विभाग व पोलीस विभागाने संयुक्तरित्या धाड टाकून कारवाई केली. दरम्यान नियमबाहयरित्या चालणाऱ्या सावकारी व्यवहाराचे कागदपत्रे आढळून आली असता ती कागदपत्रे जप्त करुन त्यांच्या विरुध्द सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत कारवाई केली जात असल्याचे सहकार विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
मनोज मुरलीधर नेवलकर व सौ.मिना मनोज नेवलकर रा.गांधीवार्ड क्रमांक ९ असे अवैध सावकारी करत असलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तथा सावकारांचे निबंधक गडचिरोली प्रशांत धोटे यांचे आदेशान्वये शासनाकडे बेकायदेशीर अवैध सावकारीच्या अनुषंगाने, ७ डिसेंबर २०२२ रोजी, २५ नोव्हेंबर २०२२ रोजी पोलीस स्टेशन कडून व अन्य ५ तक्रारदार यांचे कडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार मनोज मुरलीधर नेवलकर व सौ.मिना मनोज नेवलकर रा.गांधीवार्ड क्रमांक-९ गडचिरोली हे दाम्पत्य बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करीत असल्याची माहिती मिळाली असता गडचिरोली चे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हेमंत सौलाखे व सहाय्यक निबंधक (प्रशासन) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोलीचे संजीव देवरे यांनी त्यांचे पथकासह अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याच्या घरी धाड सत्र राबवुन आक्षेपार्ह कागदपत्रांचा शोध घेतला असता शोध मोहीमेत ३ कोरे स्टॅम्प पेपर, ४ कोरे धनादेश, २ रेव्हेन्यु तिकिट लावलेल्या पावत्या, रकमेच्या नोंदी असलेल्या ३० चिठ्ठया, ३ रजीस्टरची पाने व १० हिशोबाच्या नोंद वहया, १० बँक पासबुक, अनेक व्यक्तीच्या नावाने असलेल्या /मतदान कार्ड/ पॅनकार्ड /आधार कार्डांच्या ६५ छायांकित प्रती, विक्रीपत्र, मालमत्ता पत्र इत्यादी आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली. सदर कागदपत्रांची चौकशी नंतर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे निबंधक हेमंत सौलाखे यांनी सांगीतले.
सदर कारवाई गडचिरोलीचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संजीव देवरे, सहाय्यक ( प्रशासन) सहकारी संस्था, गडचिरोली, हेमंत सौलाखे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गडचिरेाली यांचे पथकाने सकाळी ८.२० मिनिटींनी धाड घातली यात त्यांना सुशिल वानखेडे, सहकार अधिकारी श्रेणी-१, कुरखेडा, विजय पाटील, शैलेंद्र खांडरे, हेमंत जाधव, ऋषीश्वर बोरकर, शालीकराम सोरते, शांताराम कन्नमवार, शैलेश वैद्य, तुषार सोनुले, प्रशांत प्रेमलवार महिला कर्मचारी सौ.अनिता हुकरे, श्रीमती धारा कोवे, यांनी धाड यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या कारवाईसाठी पंच म्हणुन रमेश कोलते, गटसचिव विविध कार्यकारी सहकारी संस्था, गडचिरोली व घनश्याम भुसारी आदिवासी विविध कार्यकारी संस्था, मर्या.खरपुंडी यांनी कामकाज केले. पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिपक कुंभारे यांचे नेतृत्वात पोलीस शिपाई सुनिल पुठ्ठावार व श्रीमती वत्सला वालदे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी सहकार्य केले. बेकायदेशीर तक्रारीचे अनुषंगाने काही तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,गडचिरेाली तसेच तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदारांनी पुढे येवुन तक्रार दाखल करावी असे आवाहन प्रशांत धोटे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,गडचिरोली यांनी केले आहे.

(The Gadvishva) ( Gadchiroli News Updates) (Selection of three athletes from Gadchiroli district for Mini Olympic Games) (The Gadvishava) (Gadchiroli News) (Sports) (Liverpool vs Wolves) (Serie A) (Odisha FC) (Liverpool FC) (Tiger gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here