नव्या दत्तक नियमाने तीन पालकांना हक्काचे बालक मिळाले

322

– मुल दत्तक घेण्याची प्रकिया जाणून घ्या
The गडविश्व
गडचिरोली, १० जानेवारी : जिल्ह्यातील तीन पालकांना नव्या दत्तक नियमानुसार हक्काचे बालक मिळाले आहे. ६ जानेवारी २०२३ ला नात्यातील दत्तक इच्छुक पालकांचे प्रकरण जिल्हाधिकरी संजय मिना यांच्या अंतिम आदेशाअन्वये एका दिवसात ३ प्रकरणे निकाली काढण्याल आले. त्यामुळे त्या पालकांना त्यांचे हक्काचे व कायदेशियरित्या बालक मिळाले असून तिनही कुटुंबातील सदस्य आनंदात दिसुन आली.
बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम,२०१५ मध्ये सुधारणा करून बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण सुधारित अधिनियम,२०२१ लागु करण्यात आलेला आहे.त्याअनुषंगाने २३ सप्टेंबर २०२२ रोजीच्या महिला व बाल विकास विभाग अधिसुचनेव्दारे प्रसिदध करण्यात आलेले असून सुधारीत नियमातील नियम क्र.४५(३)अन्वये न्यायालयात प्रलंबित असलेल्या दत्तक विधानाचे प्रकरण हे नियम लागु झाल्यापासुन जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांना हस्तांतरीत केल्या जाईल असे नमुद केलेले आहे. त्याअनुषंगाने दत्तक विधानाबाबत बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०२१ च्या कलम ६१ अन्वये दत्तक विधानाबाबत आदेश देण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या समवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्हा व प्रमुख सत्र न्यायालय गडचिरोली यांच्याकडे एकुण ३ नाते अंतर्गंत दत्त्क ईच्छुक पालकांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित होते. नविन अधिसुचनेनुसार प्रलंबित असलेले प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आलेले होते त्यानुसार त्यात एकूण ३ प्रकरणाचा समावेश होता.जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या मार्गादर्शनाखाली नात्यातील दत्तक ग्रहण प्रकिया अधीन राहून जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून बालकाच्या व पालकांच्या दस्तऐवजाची तपासणी करण्यात आली.गृहभेटीव्दारे दत्तक पच्छुक पालकांच्या घरी प्रत्यक्षात भेट देवून गृहचौकशी करण्यात आली. सदर अहवाल पूर्ण दस्तऐवज सहित जिल्हा बाल संरक्षण कक्षमार्फत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे अंतिम आदेशकरिता सादर करण्यात आले होते त्यानुसार आज ६ जानेवारी २०२३ ला नात्यातील दत्तक इच्छुक पालकांचे प्रकरण जिल्हाधिकरी,संजय मिना यांच्या अंतिम आदेशाअन्वये एका दिवसात ३ प्रकरणे निकाली काढण्याल आले. त्यामुळे त्या पालकांना त्यांचे हक्काचे व कायदेशियरित्या बालक मिळाले असून तिनही कुटुंबातील सदस्य आनंदात दिसुन आली.
यावेळी उपस्थित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ता तनोज ढवगाये उपस्थित होते.

अशी आहे मुल दत्तक घेण्याची प्रकिया

ज्या पालकांना मुल दत्तक घ्यायचे आहे त्यांनी दत्तक प्रकियाअंतर्गत बाळ दत्तक घेण्यासाठी cara.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. दत्तक इच्छुक पालकांची गृहभेट, सामाजीक तपासणी, आवश्यक दस्तऐवजाची पूर्तता झाल्यानंतर कारा संकेतस्ळावरून दत्तक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर सदर प्रकरण जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत छाननी करून जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर केले जाते. जिल्हाधिकारी यांच्या अंतिम आदेशाने बाळ दत्तक प्रकिया पूर्ण केली जाते.
(The Gadvishava) (Gadchiroli News) (Oxford utd vs Arsenal) (CA Final Result) (Chanda Kochhar) (TCS share Price) (GATE 2023 Admit Card) (Sajid Khan) (Delhi School news) (Man City vs Chelsea) (Sports) (Atlético Madrid vs Barcelona) (With the new adoption rules, three parents got a rightful child)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here