मुक्तिपथचा उपक्रम : देसाईगंजसह गावात व्हिडीओ व्हिडिओ व्हॅनद्वारे जनजागृती

31

The गडविश्व 
गडचिरोली, २५ मार्च : जिल्ह्यातील नागरिकांना दारू व तंबाखूचे दुष्परिणाम समजावे. ज्यांना या पदार्थाचे व्यसन नाही त्यांनी त्याच्या आहारी जाऊ नये.  ज्यांना व्यसन आहे त्यांनी स्वत: किंवा गरजेनुसार मुक्तिपथ क्लिनिक मध्ये उपचार घेऊन व्यसन सोडावे. या उद्देशाने मुक्तिपथ अभियानातर्फे  व्हिडिओ व्हॅन चित्ररथ द्वारा शाळेत, गावात, बाजारात जागृती सुरु आहे.
याच अनुषगाने नुकतेच देसाईगंज तालुक्यातील, तालुका मुख्यालयासह विविध गावांमध्ये व्हिडीओ वॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. देसाईगंज शहरातील फवारा चौकासह विविध वार्ड, तुळशी, कोंढाळा, कुरुड, उसेगाव, शिवराजपूर, गांधीनगर, सावंगी, आमगाव, लाडज या गावांमधील चौका-चौकात व्हिडिओ व्हॅनच्या माध्यमातून ‘यमराजाचा फास, शाब्बास रे गण्या,  व्यसन उपचार शिबीर’ याबद्दलचे लघुचित्रपट दाखवून लोकांना व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. सोबतच तालुका संघटक भारती उपाध्ये व प्रेरक अनुप नंदगिरवार यांनी मार्गदर्शन करून मुक्तिपथ तर्फे सुरु असलेले व्यसन उपचार गाव पातळी शिबीर व तालुका क्लिनिकची माहिती, व्यसनमुक्त होण्यासाठी उपचाराची गरज आदींबाबत माहिती देत लोकांच्या प्रश्नाचे निराकरण केले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Hailey Bieber) (France) (3 IDIOTS SEQUEL) (Chor Nikal Ke Bhaga Review) (Ajith Kumar father)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here