खासदार अशोक नेते यांचा अपघात की घातपात ? विविध चर्चेला उधाण

1766

– विविध चर्चेला उधाण
The गडविश्व
गडचिरोली, दि.०५ : गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा काल ४ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास नागपूर वरून येताना महामार्गावर अपघात झाला. यात खासदार अशोक नेते हे बालबाल बचावले. मात्र हा अपघात होता की घातपात ? असा प्रश्न सुद्धा विविध चर्चेला उधाण आल्याने उपस्थित होत आहे.
खासदार अशोक नेते हे मुंबई वरून ३ नोव्हेंबरला मध्यरात्री नागपुरात पोहचले. ४ नोव्हेंबरला सकाळी नागपूर येथून गडचिरोली येण्यास एमएच ३३ एए ९९९० क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने निघाले असता विहिरगाव जवळ अचानक त्यांच्या वाहनासामोर टिप्पर आडवा आल्याने जोरदार धडक बसली. यावेळी खासदार अशोक नेतेसह चालक, दोन सुरक्षा रक्षक व अन्य एकजण होते. अपघातादरम्यान वाहनातील एअरबॅग उघडल्याने सर्वजण सुखरूप बचावले. मात्र हा अपघात की घातपात होता असा प्रश्न मात्र विविध चर्चेतून उपस्थित होत आहे. अपघाताचा प्रसंग हा संशयास्पद असल्याचे कळते त्यामुळे एकूणच या अपघाताच्या विविध चर्चेला उधाण आले असून राजकीय वैमनस्यातून तर हा अपघात घडवून आणला नाही ना असा देखील दबक्या आवाजात सूर उमटू लागला आहे. अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्पर्धेतून हा अपघात घडवून आणला तर नाही ना अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here