धानोरा येथे चक्रीवादळाने बाजारात झाड कोसळले

205

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.१० : तालुक्यामध्ये काल सकाळपासूनच संपूर्ण ढगाळ वातावरण पसरलेले असताना अचानक दुपारी धानोरात आलेल्या चक्रीवादळाने आठवडी बाजारात झाड पडून लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची तातडीने पंचनामे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
धानोरा शहरात काल गुरुवार ९ मे २०२४ रोजी आठवडी बाजार भरलेला असताना अचानक वादळ सुरू झाले आणि याच वादळामध्ये बाजार चौकातील भले मोठे झाड भर बाजारात कोसळल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली तसेच अनेक घरांची पडझड झाल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे सुद्धा मोडलेले आहे त्यामुळे शहरांमध्ये एकच खळबळ माजली असून या चक्रीवादळाने व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आठवडी बाजार भरलेला होता. बाजारात नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. दुपारी मोठ्या प्रमाणात हवा सुरू झाली. त्याच चक्रीवादळाने मोठा झाड कोसळला. उन्हाळ्यात शेतामध्ये रब्बीत धान, मका, ज्वारी पिके असुन पिकांचे नुकसान झालेले आहे. ३० ते ४० किलोमीटर प्रति घंटा वेगाने हवा आल्याने बाजारात खळबळ माजली. अनेक घरावरचे छत उडाले, अनेक परिवार सडकेवर आले. जिल्ह्यात पडलेल्या पाण्याने जिल्ह्याच्या तापमानात घट आलेली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here