– विकास कार्य दाखविणाऱ्या चित्रफितिचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते लोकार्पण*
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : आपल्या मागील १० वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा चित्रफितीच्या माध्यमातून मांडण्याचा दैनिक देशोन्नतीचा प्रयत्न खरोखरच अभिनंदनिय आहे . त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो व त्यांची ही चित्रफित खरोखरच कौतुककास्पद आहे असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी दैनिक देशोन्नतीच्या कार्यालयामध्ये संपन्न झालेल्या या चित्रफितीच्या लोकार्पण प्रसंगी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे, शहर महामंत्री नरेश हजारे, मनिष रक्षमवार, गणेश पुण्यप्रेड्डीवार त्यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
(#thegdv #thegadvisvha #gadchirolinews #gadchirolilocalnews #gadchiroli #muktipath #dhanora )













