सकाळीच घरात शिरला बिबटया आणि…

1056

– दिसतास उडाली भांबेरी
The गडविश्व
सिंदेवाही (चंद्रपूर), २६ फेब्रुवारी : जिल्हयातील सिंदेवाही तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या मुरमाडी नजीकच्या कोटा येथील एकाच्या घरात ऐन सकाळीच बिबटया शिरल्याची घटना रविवार २६ फेब्रवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घरात बिबटया शिरल्याने एकच भांबेरी उडाली.
सदर घटनेबाबत वनविभागला माहिती देण्यात आली असता वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती परिसरात होताच बघण्यारिता गर्दी उसळली.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प नजीक असल्याने व दररोजची वन्यप्राण्यांच्या स्थलांतराने वन्यप्राणी गावाकडे भटकत आहेत. तसेच मानवरील हल्लेही होत आहे. यामुळे परिसरात असा घटनाक्रम असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. बिबटयाला जेरबंद करण्याची मोहीम वनकर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे असेही कळते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (Crystal Palace vs Liverpool) (Jake Paul vs Tommy Fury) (Real Madrid vs atlético Madrid) (Bournemouth vs Man City) (Leicester City vs Arsenal) (Sergio Ramos) (The Gdv) (Leopards live in the house) (Sindewahi) (Chandrpur) (kota) (Murmadi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here