महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्याकडे नांदेड जिल्ह्याची धुरा; काँग्रेसकडून महत्त्वाची जबाबदारी

2

महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्याकडे नांदेड जिल्ह्याची धुरा; काँग्रेसकडून महत्त्वाची जबाबदारी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्ती केली असून, महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्याकडे नांदेड जिल्हा प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. गणेश पाटील यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील नियुक्तीपत्र जारी केले. या नियुक्तीमुळे ब्राह्मणवाडे यांच्यावर पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराची महत्त्वपूर्ण जबाबदारी आली आहे.
नांदेड जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करणे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे तसेच विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचे काम प्रभावीपणे राबविणे, ही प्रमुख जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे. जिल्हा प्रभारीपदासह विधानसभा प्रभारीपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी ब्राह्मणवाडे कशा प्रकारे काम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here