गडचिरोलीत रोकडे ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचे थाटात उद्घाटन

15

गडचिरोलीत रोकडे ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचे थाटात उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : दागिन्यांच्या व्यवसायात १२४ वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या रोकडे ज्वेलर्सच्या नवीन शोरूमचे आज गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी गडचिरोलीत उद्घाटन झाले. चंद्रपूर-मूल मार्गावरील हॉटेल जिंजरजवळ उभारण्यात आलेल्या या शोरूमचे उद्घाटन भैयाजी रोकडे, वंदना रोकडे आणि प्रमुख अतिथी पुरुषोत्तम कावळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी रोकडे ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश रोकडे, संचालक सारंग रोकडे, पारस रोकडे, अनामिका रोकडे आणि संस्कृती रोकडे यांच्यासह रोकडे कुटुंबीय, व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
सुमारे ३,६०० चौरस फुटांहून अधिक क्षेत्रात असलेल्या या शोरूममध्ये सोन्या-चांदीचे दागिने, हिऱ्यांचे दागिने, पोलकी, कुंदन आणि वधूंसाठीच्या दागिन्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइन्सचा समावेश असून, ग्राहकांच्या मागणीनुसार दागिने तयार करून देण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे.

तीन दिवस उद्घाटनानिमित्त सवलती

शोरूमच्या उद्घाटनानिमित्त १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. तसेच पुढील खरेदीसाठी घडणावळीवर २५ टक्के सवलत देणारे गिफ्ट व्हाउचर देण्यात येणार आहे. या ऑफर्ससाठी नियम व अटी लागू राहतील.
ग्राहकांसाठी सोन्याची शुद्धता तपासण्याकरिता मोफत कॅरेटमीटर सुविधा, ज्योतिषीय मार्गदर्शन आणि जुन्या सोन्याच्या वितळवण्याच्या प्रक्रियेचे रेकॉर्डिंग अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे शोरूम असलेल्या रोकडे ज्वेलर्सने गडचिरोलीतील नव्या शाखेच्या माध्यमातून विदर्भातील विस्तारात आणखी एक पाऊल टाकले आहे. आगामी तीन महिन्यांत यवतमाळ जिल्ह्यातही नवीन शोरूम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here