गडचिरोलीत मोठी कारवाई : लाच घेताना स्वीकृत नगरसेवक एसीबीच्या जाळ्यात

76

गडचिरोलीत मोठी कारवाई : लाच  घेताना स्वीकृत नगरसेवक एसीबीच्या जाळ्यात
– १.२० लाखांची विद्युत कामांच्या कंत्राटासाठी घेतली लाच
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : अहेरी नगरपंचायतीच्या विद्युत कामांच्या कंत्राटापोटी कमिशनची मागणी केल्याच्या आरोपावरून भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली. गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी अहेरीच्या मुख्य बाजारपेठेत कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपये स्वीकारताना त्यांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईने राजकीय तसेच नगर पंचायत क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नगरपंचायतीअंतर्गत शहरात विविध विद्युत कामे प्रस्तावित होती. एका कंत्राटदाराने या कामांचे कंत्राट घेतले होते. या कामांच्या मोबदल्यात गुडेल्लीवार यांनी कंत्राटदाराकडे १ लाख २० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने संबंधित कंत्राटदाराने गोंदिया येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने १५ ऑक्टोबर रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यात मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुडेल्लीवार यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानुसार, दुपारी सुमारे एक वाजता अहेरीच्या मुख्य बाजारपेठेत कंत्राटदाराकडून रक्कम स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.
या कारवाईत गोंदिया एसीबीचे उपअधीक्षक नीलेश लोधी आणि गडचिरोली एसीबीचे उपअधीक्षक विक्रांत सगणे यांच्या पथकांचा सहभाग होता. या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #acb #aheri #nagrpanchayat #bjp #gadchirolilocalnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here