अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
The गडविश्व
मुंबई, दि. ०८ : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी पहाटे गोव्यात त्यांचे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. कार्डियाक अरेस्ट आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या प्रभावी संवादफेकीने आणि वास्तववादी अभिनयाने त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच कलाविश्वासह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नाना पाटेकर यांना २०१३ मध्ये देशातील प्रतिष्ठेच्या पद्मश्री नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमधील भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल्या.
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ‘नानाची वाडी’ म्हणून ओळखले जाणारे हे फार्महाऊस त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचे ठिकाण होते.
नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, प्रभावी आणि दमदार कलाकार गमावला आहे. त्यांच्या अभिनयाचा ठसा भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात कायम स्मरणात राहणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #NanaPatekar #NanaPatekarDeath #NanaPatekarPassedAway #Bollywood #MarathiCinema #HindiCinema #IndianCinema #MarathiFilmIndustry #BollywoodNews #EntertainmentNews #NanaPatekarFans #PadmaShri #NanaPatekarTribute #BreakingNews #TheGadvishva













