गडचिरोली : लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आरोग्य विभागाकडून चौकशी

14

गडचिरोली : लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आरोग्य विभागाकडून चौकशी
– AEFI समितीमार्फत तपास सुरू, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ९ : अहेरी तालुक्यातील कवराम येथे नियमित लसीकरणानंतर प्रकृती खालावलेल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची लसीकरणानंतरची प्रतिकूल घटना (AEFI) म्हणून नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण शोधण्यासाठी जिल्हास्तरीय AEFI समितीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
कवराम येथील सुनिता शामराव तलांडी यांच्या दोन महिन्यांच्या बालकाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत आयोजित नियमित लसीकरण सत्रात लसीचे डोस देण्यात आले होते. लसीकरणानंतर बालकाची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतली. जिल्हास्तरीय AEFI समितीकडून घटनास्थळाची पाहणी तसेच लसीकरण प्रक्रियेची तपासणी केली जात आहे. यामध्ये लसींची साठवणूक व शीतसाखळी व्यवस्था, वापरण्यात आलेल्या लसीची बॅच, लसीकरणाची प्रक्रिया आणि बालकाची वैद्यकीय पार्श्वभूमी यासह विविध बाबी तपासल्या जात आहेत.
दरम्यान, लसीकरण आणि बालकाचा मृत्यू यांच्यात कारणात्मक संबंध असल्याचा कोणताही निष्कर्ष सध्या काढण्यात आलेला नाही. बालकाच्या शवविच्छेदनाचा अहवाल तसेच AEFI समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
नागरिकांनी या घटनेबाबत अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी केले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #GadchiroliNews #Vaccination #ChildDeath #AEFI #HealthDepartment #HealthNews #MaharashtraNews #Aheri #Kavaram #ChildHealth #Immunization #HealthUpdate #TheGadVishwa

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here