एलपीजी ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता २५ दिवसांत पुन्हा सिलेंडर बुक करता येणार

18

एलपीजी ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता २५ दिवसांत पुन्हा सिलेंडर बुक करता येणार
The गडविश्व
नवी दिल्ली, दि.०८ : घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने सिलेंडर बुकिंगच्या नियमात महत्त्वाचा बदल केला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने दोन एलपीजी रिफिल बुकिंगमधील अंतर ४५ दिवसांवरून थेट २५ दिवसांवर आणले आहे. त्यामुळे आता मागील सिलेंडर बुक केल्यानंतर २५ दिवस पूर्ण झाल्यावर ग्राहकांना पुढील सिलेंडरची बुकिंग करता येणार आहे.

यापूर्वी घरगुती एलपीजी रिफिलच्या दोन बुकिंगमध्ये ४५ दिवसांचे अंतर ठेवण्यात आले होते. त्यामुळे महिन्याभरात सिलेंडर संपणाऱ्या कुटुंबांना पुढील सिलेंडरसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागत होती. विशेषतः ग्रामीण भागातील अधिक एलपीजी वापर असलेल्या कुटुंबांना या नियमाचा मोठा त्रास होत होता.

ग्रामीण-शहरी ग्राहकांसाठी समान नियम

नव्या निर्णयामुळे आता ग्रामीण आणि शहरी भागातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी २५ दिवसांचा समान बुकिंग गॅप लागू होणार आहे. त्यामुळे गरजेनुसार पुढील सिलेंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक सुविधा मिळणार आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या या निर्णयामुळे घरगुती गॅसचा नियमित वापर करणाऱ्या ग्राहकांना विशेषतः दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सिलेंडर लवकर संपल्यास ४५ दिवसांच्या प्रतीक्षेची अडचण दूर होऊन २५ दिवसांनंतर पुन्हा रिफिल बुक करता येणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here