ज्ञानाचा दीप तेवत ठेवणाऱ्या डॉ. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १२ : येथील ॲड. विठ्ठलराव बनपूरकर कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. एच. एम. कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. दिलीप नंदेश्वर होते.
कार्यक्रमाला प्रा. कुमरे, प्रा. डॉ. राऊत, प्रा. डॉ. वैद्य व प्रा. डॉ. ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात प्रा. नंदेश्वर यांनी डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा व ग्रंथालयशास्त्रातील योगदानाचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे संचालन ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. डॉ. पल्लवी काळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. आष्टेकर, प्रा. नूरुटी, प्रा. रामटेके, प्रा. कुमरे, प्रा. सहारे यांच्यासह सेलोकर, समर्थ व जांभुळे उपस्थित होते. आभार प्रदर्शन ग्रंथालय परिचर दीपक बनपूरकर यांनी केले.













