हमालांच्या श्रमाला सलाम : सहकार दिनानिमित्त कुरखेड्यात श्रमिकांचा सन्मान
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०५ : आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, कुरखेडा यांच्या वतीने हमाल कामगार बांधवांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. समाजाच्या आर्थिक, कृषी व सहकारी व्यवस्थेचा कणा असलेल्या श्रमिकांच्या कार्याचा गौरव करणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पदाधिकारी-कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये म्हणाले की, “हमाल कामगारांचे समाजाच्या विकासातील योगदान अनन्यसाधारण असून त्यांच्या श्रमाचा सन्मान करणे हीच सहकार चळवळीची खरी परंपरा आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुरावजी तुलावी होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोपाल उईके, संचालक यशवंतराव चौरीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व्यंकटी नागीलवार, शेतकरी नेते घीसू पाटील खुणे, संचालक विनोद खुणे, आविका व्यवस्थापक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत शेंद्रे, सोनसरी आविका संस्थेचे सभापती प्रभाकर जुमनाके यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.
यावेळी गोपाल उईके, यशवंतराव चौरीकर, विनोद खुणे, हेमंत शेंद्रे, प्रभाकर जुमनाके आणि घीसू पाटील खुणे यांनी सहकार चळवळीचे महत्त्व, श्रमिकांच्या सन्मानाची गरज तसेच कृषी व बाजार व्यवस्थेतील हमाल कामगारांच्या मोलाच्या योगदानावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात हरदेव उईके, लोकनाथ राऊत, अमरसिंग राऊत, अमीर राऊत, प्रतीक राऊत, जितेन पायपुल, मुकेश कपूर, गुरुदेव नेवारे, रामअवतार नैताम, आकाश मेश्राम, विनायक वटी, किशोर नागोसे, सचिन उपमडे, मोरेश्वर कवडो, किर्तराम कोसरे, राजेश नागोसे, अनिल तुलावी, विकास गावळे, सुमित तुलावी, महेंद्र नैताम आणि शेखर तुलावी या हमाल कामगारांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद नागपूरकर यांनी केले. प्रास्ताविक हेमंतभाऊ शेंद्रे यांनी तर आभार संस्थेचे व्यवस्थापक लीलाराम घोसेकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे व्यवस्थापक लीलाराम घोसेकर, कपिल तुलावी, विवेक नरोटे, माणिक दरवडे, रामदास मस्के, दुर्गाताई मालुसरे तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सहकार दिनानिमित्त श्रमिकांचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.













