प्रभात फेरी, जल्लोषात स्वागत अन् पाठ्यपुस्तकांचे वाटप ; सोनसरीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

75

प्रभात फेरी, जल्लोषात स्वागत अन् पाठ्यपुस्तकांचे वाटप ; सोनसरीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि.०१ : कुरखेडा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा, सोनसरी येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेला शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रभात फेरी, नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत, तसेच पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण अशा विविध उपक्रमांमुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी (एसडीएम) किरण वागस्कर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात गावातून प्रभात फेरीने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वितरण करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमारनाथ प्रधान, नरनवरे, कु. अलका कुमरे, कु. चडगुळवार यांच्यासह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी, शाळेशी त्यांचे भावनिक नाते दृढ व्हावे आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सवाला पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
#thegdv #thegadvishva #Theगडविश्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here