कॅन्सरग्रस्त महिलेला येरकड पोलिस मदत केंद्राची आर्थिक मदत

57

कॅन्सरग्रस्त महिलेला येरकड पोलिस मदत केंद्राची आर्थिक मदत
– पोलिस उपनिरीक्षक मयुर पवाडे यांच्या पुढाकारातून स्तुत्य सामाजिक उपक्रम
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १४ : गंभीर आजारांवरील उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना येरकड पोलिस मदत केंद्राने सामाजिक बांधिलकी जपत कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदतीचा हात दिला. पोलिस उपनिरीक्षक मयुर पवाडे यांच्या नेतृत्वाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
धानोरा तालुक्यातील येरकड येथील तायाबाई साखरे या महिला कॅन्सरग्रस्त असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मयुर पवाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पुढाकार घेत स्थानिक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पीडित महिलेच्या घरी भेट दिली. यावेळी कॅन्सर उपचारासाठी १८ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. तसेच पुढील उपचारासाठी नागपूर येथे जाऊन वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्लाही देण्यात आला.
पोलिस विभागाच्या या संवेदनशील आणि मानवतावादी भूमिकेचे परिसरातून कौतुक होत असून, गरजूंसाठी पोलिस दलाने दाखविलेली सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी ठरत आहे.
या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते हर्षानंद भैसारे, विलास शिंपी, पुष्पा नरोटे तसेच येरकड पोलिस मदत केंद्रातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here