कुरखेड्यात मका खरेदी केंद्राचा शुभारंभ ; शेतकऱ्यांना दिलासा

68

कुरखेड्यात मका खरेदी केंद्राचा शुभारंभ ; शेतकऱ्यांना दिलासा
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०७ : आदिवासी विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, कुरखेडा यांच्या वतीने येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामात मका खरेदी केंद्राचे उद्घाटन मंगळवारी उत्साहात संपन्न झाले. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मका लागवड होत असल्याने शेतकऱ्यांची दीर्घकाळापासून असलेली मागणी अखेर पूर्ण झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
या केंद्राचे उद्घाटन आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोपाल उईके व अविमचे संचालक यशवंत चौरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव तुलावी तसेच उपाध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये प्रमुख उपस्थित होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद खुणे, मोनेश मेश्राम, विनोद नागपूरकर, आविकाचे संचालक पुंडलिकराव निपाने, अंतराम गावळे, काशिनाथ पुडो, आविका आंधळीचे व्यवस्थापक हेमंत शेंद्रे, हिराजी माकडे, आविका कुरखेडाचे व्यवस्थापक लीलाराम घोसेकर, गेवर्धा केंद्रप्रमुख रामदास मस्के, कुरखेडा केंद्रप्रमुख कपिल तुलावी, आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी डी. जी. मरसकोल्हे, तहसील कार्यालयाचे गोदाम व्यवस्थापक भाऊदास टेंभुर्णे, परिचंद साखरे यांच्यासह अनेक मान्यवर व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेले हे केंद्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.
शासकीय मका खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here