एटापल्लीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सहविचार सभा : संघटन बळकटीसाठी मार्गदर्शन

85

एटापल्लीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सहविचार सभा : संघटन बळकटीसाठी मार्गदर्शन
The गडविश्व
एटापल्ली, दि. ०४ : महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी संघटना, नागपूर विभागाच्या वतीने एटापल्ली येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला अहेरी व भामरागड परिसरातील मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित राहून संघटनात्मक विषयांवर चर्चा केली.
सभेच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष तुरकर साहेब होते. यावेळी बोरकर मॅडम, तलमले तसेच गडचिरोली प्रकल्पाचे अध्यक्ष जितेंद्र दोडके यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी चतुर्थ श्रेणी संघटना प्रभावीपणे कशी चालवावी, तिची ताकद आणि एकजुटीचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तलमले यांनी कर्मचाऱ्यांना संघटनेचे फायदे व संभाव्य अडचणी यांची माहिती दिली, तर यामिनी मॅडम यांनी महिलांनी संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. जितेंद्र दोडके यांनी प्रकल्पातील कामकाजाची दिशा व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.
सभेदरम्यान अहेरी येथे अध्यक्षपदी सुरेश जाकेवार व सचिवपदी पाटील मॅडम, तर भामरागड येथे अध्यक्षपदी चंदू येताम व सचिवपदी अग्गुवार यांची निवड करण्यात आली.
या सहविचार सभेला सोमनकर, चलाख, कसनवार, बोकडे, गोरटेकर, कंकलावार मॅडम आदी शालेय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक येताम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here