कुरखेडा शहर गांजाच्या विळख्यात; निर्जन ठिकाणी उघडपणे नशेचे अड्डे फोफावले

36

कुरखेडा शहर गांजाच्या विळख्यात; निर्जन ठिकाणी उघडपणे नशेचे अड्डे फोफावले
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १४ : शहरात वाढत्या गांजा व्यसनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, विशेषतः महाविद्यालयीन युवकांमध्ये या व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. शहरालगतची निर्जन ठिकाणे आता नशेबाजांचे ‘हॉटस्पॉट’ बनत असून, उघडपणे गांजाचे सेवन होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
नदीकाठ परिसर, जि.प. शाळेचे मैदान, बसस्थानक परिसर, हनुमान मंदिराजवळील तलावाची पाळ, बायपास रोड तसेच नाका परिसरात सायंकाळच्या सुमारास युवकांचे टोळके जमा होताना दिसतात. या ठिकाणी ४ ते ५ जणांच्या गटात सिगारेटमध्ये गांजा भरून सेवन केले जात असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या प्रकारामुळे शहरातील शैक्षणिक व सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असून पालक व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, चुकीचे आकर्षण आणि सहज उपलब्धता ही या व्यसनामागील प्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे मत आहे.
तज्ञांच्या मते, शिक्षणाच्या वयात लागलेले व्यसन युवकांच्या भविष्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. अशा प्रवृत्तीमुळे केवळ वैयक्तिक नव्हे तर समाजाच्या भविष्यासही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस गस्त वाढवण्याची मागणी

दरम्यान, गांजाच्या वाढत्या वापरावर आळा घालण्यासाठी पोलिस विभागाने निर्जन व संशयित ठिकाणी नियमित गस्त वाढवावी, तसेच पुरवठा साखळीचा शोध घेऊन ती मोडीत काढावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #कुरखेडा #गांजाव्यसन #DrugAbuse #YouthInDanger #SaveStudents #NashaMukti #StopDrugs #MaharashtraNews #SocialIssue #BreakingNews #trending #viral #कुरखेडा #DrugAbuse #YouthInDanger #BreakingNews #India #Maharashtra #India #Maharashtra #NewsUpdate #BreakingIndia
#LocalNews #CrimeNews #YouthIssue #DrugAbuse #SaveYouth #SocialAwareness

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here