शहीद दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथे श्रद्धांजली कार्यक्रम
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ३० जानेवारी रोजी शहीद दिन श्रद्धा व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बलिदानदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सकाळी ठीक ११ वाजता दोन मिनिटांचे मौन पाळून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, मनोगत व प्रार्थना सादर केली.
यावेळी शिक्षकांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता व देशप्रेम या गांधी विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवून शहीदांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक पी. व्ही. साळवे होते. प्रमुख अतिथी म्हणून पी. बी. तोटावार, रत्नागिरी सर, भोगे सर, बुरमवार सर, डॉ. रश्मी डोके, रजनी मडावी, कांचन दशमुखे, रेखा कोरेवार, प्रियांका आनंदवार, पी. टी. शेंडे सर व भालेराव सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मोहन देवकते यांनी केले तर आभार प्रदर्शन हरीश पठाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयराम कोरेटी यांनी विशेष परिश्रम घेतले.













