गडचिरोलीत नगराध्यक्षपदासाठी प्रणोती निंबोरकर यांच्याच नावाची जोरदार चर्चा
– नव्या नेतृत्वाच्या शोधात भाजप
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच गडचिरोलीच्या राजकारणात एकच नाव गाजत आहे – प्रणोती सागर निंबोरकर. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरात राजकीय समीकरणांना वेग आला असून, नुकत्याच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या प्रणोती सागर निंबोरकर यांच्याकडे नगराध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
नगर परिषद निवडणुकीस अवघे काही दिवस उरले असताना उमेदवार निवडीची लगबग सर्व पक्षांत सुरू आहे. अशातच अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रणोती निंबोरकर यांनी आपल्या प्रभावी कार्यशैली, प्रखर जनसंपर्क आणि सेवाभाव या माध्यमातून अल्पावधीतच नागरिकांचा, महिला वर्गाचा तसेच युवकांचा विश्वास संपादन केला आहे.
काही स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे गडचिरोली भाजपमध्ये नवी ऊर्जा व जोम निर्माण झाला आहे. शहरातील महिलांच्या सबलीकरणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, तसेच पारदर्शक प्रशासनासाठी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असताना प्रणोती निंबोरकर यांनी वंचित घटकांच्या मदतीसाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या कार्यातून “जनसेवा हीच ईश्वरसेवा” हा भाव स्पष्ट दिसतो, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
महिला सबलीकरण, युवकांसाठी रोजगार उपक्रम, आणि शहरातील विकासकामांतील पारदर्शकता या तीनही आघाड्यांवर प्रणोती निंबोरकर यांनी कार्याचा ठसा उमटवला आहे. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” हा त्यांचा कार्यमंत्र असल्याचे त्यांच्या उपक्रमांतून स्पष्ट जाणवते.
शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी वर्ग, महिला मंडळे, युवक व युवती यांच्यात एकमताने मागणी होत आहे की, “गडचिरोली नगर परिषदेचा विकासाचा नवा अध्याय सुरू करायचा असेल, तर नगराध्यक्षपद प्रणोती निंबोरकर यांनाच द्यावे”. भाजपाच्या ध्येयधोरणाशी प्रामाणिक राहून कार्य करणाऱ्या प्रणोती निंबोरकर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहरात सशक्त नेतृत्व, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसमावेशक विकास या त्रिसूत्रीचा नवा युगारंभ होईल, असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #GadchiroliElection2025 #PranotiNimborkar #BJP #Leadership #Development #WomenInPolitics













