इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीला

226

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीला
– ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
The गडविश्व
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शासनमान्य शाळांमध्ये इ. पाचवी किंवा इ. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची सुविधा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या संकेतस्थळांवर २७ ऑक्टोबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येईल, तर १ डिसेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
या परीक्षेत प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी असे चार विषय असतील. एकूण ३०० गुणांच्या या परीक्षेचे प्रश्नपत्र मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु आणि कन्नड या सात माध्यमांमध्ये उपलब्ध असतील.
इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांचे वय ११ वर्षांपर्यंत (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १५ वर्षांपर्यंत) आणि इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांचे वय १४ वर्षांपर्यंत (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १८ वर्षांपर्यंत) असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहाव्यात, असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #ScholarshipExam #MaharashtraEducation #MSCE #PUPPS #PMSS #StudentsNews #EducationUpdate #OnlineApplication #SchoolStudents #Scholarship2026 #ExamNews #MarathiMedium #StateExamCouncil #AnuradhaOak #MSCEPune #GovernmentExam #Pune #PrimaryScholarship #MiddleSchoolScholarship #EducationDepartment #StudentOpportunity

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here