परसवाडीत अनोखी परंपरा : दसऱ्याला रावणाची पूजा, शस्त्रपूजेसह रावण महोत्सव साजरा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०३ : तालुक्यातील परसवाडी गावाने पुन्हा एकदा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेचे दर्शन घडवले. पहादी पारी कुपार लिंगो गोंडी धर्म महासंघ संलग्न गोंडवाना गोंडी संस्कृती बचाव समिती, परसवाडी यांच्या तर्फे यावर्षी रावण महोत्सव व दसरा (शस्त्र) पूजा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
२ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी गोंडी देवी-देवतांची महापूजा पार पडली. देशभरात वाईट प्रवृत्तीवर विजयाचे प्रतीक म्हणून रावण दहनाची प्रथा आहे. मात्र, परसवाडी हे त्याला अपवाद ठरते. या गावात गेली जवळपास ४० वर्षे रावणाची देव मानून पूजा केली जाते.
येथील आदिवासी बांधवांचा विश्वास आहे की रावण हा खलनायक नसून देवतुल्य होता. त्याच श्रद्धेतून गावात रावणाचे मंदिर बांधण्यात आले असून दरवर्षी या दिवशी रावणाची पूजा व शस्त्रपूजा केली जाते. परंपरा आणि संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न आदिवासी समाजातील एक आगळावेगळा सांस्कृतिक वारसा ठरत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #RavanFestival #UniqueTradition #Gadchiroli #Dussehra #RavanPuja #TribalCulture #Gondwana #Parsavadi #CulturalHeritage #IndiaTraditions













