गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सुविधांची दुरावस्था ; MRI मशीनसाठी 43 वर्षांपासून प्रतीक्षा

157

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सुविधांची दुरावस्था ; MRI मशीनसाठी 43 वर्षांपासून प्रतीक्षा
-रूपेश वलके यांची जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवांची बिकट अवस्था लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते रूपेश रमेश वलके यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर केले.
निवेदनात त्यांनी गेल्या ४३ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली MRI मशीन तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला-बाल रुग्णालयात नवीन तंत्रज्ञानाच्या यंत्रणा, टेलीमेडिसीन सुविधा, इमर्जन्सी इंजेक्शन्सचा साठा, तसेच डॉक्टर व परिचारिका (नर्सेस) यांच्या नेमणुकीची मागणी केली आहे.
तसेच, गडचिरोली जिल्ह्यात नवीन 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका, महिला-बाल रुग्णालयात रक्तपेढी, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्रांतीगृह, आणि इतर जिल्ह्यांना होणाऱ्या अतिरिक्त रेफरल्सवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध न झाल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रूपेश वलके यांनी दिला आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील जनतेला अद्याप MRI मशीनसारख्या मुलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, ही खरोखरच आरोग्य व्यवस्थेची गंभीर शोकांतिका असल्याचे नागरिकांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #GadchiroliHealthCrisis #MRIWaiting43Years #HealthcareEmergency #RupeshWalkeAppeal
#GovtHospitalFacilities #MedicalInfrastructure
#HealthRights #TelemedicineSupport #EmergencyAmbulance #PatientCare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here