चिचटोला येथे युवा संघर्ष संघटनेची स्वच्छता मोहीम यशस्वी

87

The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा, दि. २१ : युवा संघर्ष संघटना, चिचटोला शाखेच्या वतीने रविवारी गावात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि कचरा व्यवस्थापनावर भर देणे हा होता.
मुख्य संघटक अतुल सिद्राम व शाखाध्यक्ष सचिन ओटी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात डोमेश ओटी, विकास मडावी, सतीश सिद्राम, विजय मडावी, अमन सिद्राम, विक्रम मडावी, गुलाब पडोटी, ईशांत नैताम, डीगेश मडावी, कुमारी रीना मडावी, लक्ष्मी नैताम, विद्या नैताम, ईशा नैताम आणि अप्सरा मडावी यांनी सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय अनेक सामाजिक कार्यकर्ते व गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली तसेच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व व्यवस्थापन कसे करावे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण आणि प्रत्येक व्यक्तीने यात हातभार लावण्याची गरज यावर भर दिला.
युवा संघर्ष संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले असून, अशा प्रकारच्या जनजागृतीपर उपक्रमांना पुढील काळात अधिकाधिक प्रोत्साहन दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here