धानोरा : रानटी डुकराच्या हल्ल्यात तुकुम येथील वयोवृद्ध जखमी
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १९ : तालुक्यातील तुकुम (शिवटोला) येथील एका वयोवृद्धावर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.
सुंदर पुसू गावडे (वय ७४) असे जखमी वृद्धाचे नाव असून ते शौचालयासाठी गेले असता अचानक रानटी डुकराने त्यांच्यावर धाव घेत हल्ला केला. आरडाओरडा केल्यामुळे त्यांची सुटका झाली. घराशेजारील शेतालगत जंगल असल्याने डुकराचा कळप गावात आला होता. यावेळी एका डुकराने गावडे यांना डाव्या हाताला तसेच मांडीला दोन ठिकाणी चावा घेत गंभीर जखमी केले. त्यामुळे त्यांच्या शरीरावरील मास लोमकळत राहिले.
तत्काळ गावकऱ्यांनी त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र गजभिये यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार (दक्षिण), क्षेत्र सहाय्यक आर. एम. नरुले, मिलिंद कोडाप, वनरक्षक व अन्य कर्मचारी रुग्णालयात दाखल होऊन विचारपूस केली. तसेच पंचनामा करून “वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #WildAnimalAttack #BoarAttack #Gadchiroli #ElderlyInjured #ForestDepartment #HumanWildlifeConflict #RuralNews #MaharashtraNews #WildlifeSafety #BreakingNews













