मित्राच्या वाढदिवसानिमित्त अवयवदानाचा संकल्प : गडचिरोलीतील तरुणांचा प्रेरणादायी उपक्रम
– स्वयं रक्तदाता जिल्हा समिती गडचिरोलीचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : “मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवू या, चला अवयवदान करू या…” या उदात्त विचाराला प्रत्यक्षात उतरवत गडचिरोलीतील मित्राच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त २९ मित्रांनी अवयवदानाचा संकल्प करून समाजात प्रेरणादायी संदेश दिला आहे.
स्वयं रक्तदाता जिल्हा समिती गडचिरोलीचे कोषाध्यक्ष आकाश पि. आंबोरकर यांच्या पुढाकारातून १८ सप्टेंबर रोजी स्वेच्छिक मरणोत्तर अवयवदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हा युवा अध्यक्ष राहुल भांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आभासी पद्धतीने पंचायत समिती मुलचेरा येथील गटविकास अधिकारी विजय एल. पेंदाम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत होते.
यावेळी आकाश आंबोरकर, राहुल भांडेकर, अजय सोमनकर, अंकुश मोंगरकर, आकाश सोनटक्के, वैभव किरमे, प्रकाश कुनघाडकर, हर्षद वैरागडे, लखन देशमुख, चारुदत्त राऊत, तुषार वैरागडे, देवेंद्र कुथे, नितेश मेश्राम, नितीन गव्हारे, संतोष वनस्कर, प्रथमेश राऊत, राज कुनघाडकर, रमाकांत पिपरे, महेंद्र लटारे आदी २९ तरुणांनी अवयवदानाचा संकल्प करून समाजसेवेचे मोलाचे उदाहरण घालून दिले.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणाई समाजहितासाठी कटीबद्ध असून, अशा कार्यातून सकारात्मक बदल घडू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #OrganDonation #Gadchiroli #YouthForChange #Avayavdan #BloodDonorCommittee #SocialInitiative #Inspiration #Volunteerism #HealthAwareness #Humanity













