निमगाव–रांगी लाईन बिघाडामुळे ग्रामस्थ त्रस्त : तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी

52

निमगाव–रांगी लाईन बिघाडामुळे ग्रामस्थ त्रस्त : तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी
– अन्यथा आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : तालुक्यातील निमगाव ते रांगी गावाला जोडणाऱ्या मुख्य विद्युतवाहिनीवर गंभीर बिघाड झाल्याने रांगी गावात गेल्या काही दिवसांपासून कमी व्होल्टेजचा मोठा त्रास सुरू आहे. सध्या गावाला बॅकफीड बॅकलाइन द्वारे तात्पुरता वीजपुरवठा केला जात असून त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण गावात दिवसरात्र लाईन डीम होत आहे.
यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरगुती उपकरणे तसेच शेतीसाठी लागणारी मोटारे वारंवार बंद पडत आहेत. शेतकऱ्यांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने शेती पिकांनाही फटका बसत आहे.
ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. “मुख्य लाईन तात्काळ दुरुस्त करावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशारा उपविभागीय अभियंता विद्युत वितरण कंपनी मर्यादित, धानोरा यांना निवेदनातू सोनू पठाण, महेश दुगे, दिनेश चापले, जावेद सय्यद, स्वराज कन्नाके, खुशाल वालदे, प्रेम उंदिरवाडे आणि शमीरखाँ पठाण यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanoaranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here