गडचिरोली : भीषण चकमकीत ४ जहाल नक्षलवादी ठार

4526

– घटनास्थळावरून ०१ SLR , ०२ INSAS व ०१ .३०३ रायफल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातीलकोपर्शी जंगल परिसरात २५ ऑगस्ट रोजी पोलिस व माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत ४ जहाल नक्षलवादी ठार झाल्याची माहिती असून यात १ पुरुष व ३ महिला माओवादींचा समावेश आहे. घटनास्थळावरून ०१ SLR रायफल, ०२ INSAS रायफल व ०१ .३०३ रायफल असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
विश्वासार्ह गुप्त माहितीनंतर अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली C-60 च्या १९ पथकांबरोबर CRPF QAT च्या २ पथकांनी मोहिम हाती घेतली होती. सलग दोन दिवस मुसळधार पावसाचा सामना करत पोलीस पथके जंगल परिसरात दाखल झाली आणि शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार केला. मात्र पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. तब्बल ८ तास चाललेल्या चकमकीनंतर परिसरात शोध घेतला असता ४ माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले.
या कारवाईमुळे गडचिरोली विभागातील माओवादी संघटनांना मोठा धक्का बसला असून, उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #गडचिरोली #नक्षलवाद #C60 #CRPF #चकमक #नक्षलविरोधीअभियान #गडचिरोलीपोलीस #नारायणपूर #माओवादी #MaoistEncounter #गडचिरोली #नारायणपूर #नक्षलवाद #माओवादी #चकमक #C60 #CRPF #नक्षलविरोधीअभियान #गडचिरोलीपोलीस #सुरक्षादले #Gadchiroli #Naxal #Maoist #Encounter #AntiNaxalOperation #C60Force #CRPF #SecurityForces #Narayanpur #MaoistEncounter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here