नदी पुलावर दोन ट्रकांची समोरासमोर धडक ; गडचिरोली–मूल मार्ग ठप्प

2152

– वाहनांच्या लांबच लांब रांगा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलावर आज सकाळी दोन ट्रकांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामुळे गडचिरोली–मूल महामार्गावरील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली असून काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे कार्यालयीन कामासाठी निघालेले नोकरदार वर्ग, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी अडकले. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे. या अपघाताने गडचिरोली – चंद्रपूर मार्गे प्रवास करणाऱ्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक व्यवस्थापन सुरू केले. दरम्यान, युद्धपातळीवर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू असून लवकरच मार्ग सुरळीत होईल.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोलीअपघात #भीषणधडक #वैनगंगापूल #गडचिरोलीचंद्रपूरमार्ग #वाहतूकठप्प #ब्रेकिंगन्यूज #पोलिसकारवाई #वाहनरांगा #GadchiroliAccident #TruckCollision #WaingangaBridge #GadchiroliChandrapurRoute #TrafficJam #BreakingNews #PoliceAction #LongVehicleQueues

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here