The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २२ : हरिओम कॉम्प्युटर, धानोरा येथे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चा रौप्यमहोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जे.एस.पी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय थुल यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. एच.डी. लांजेवार, प्रा. ज्ञानेश बनसोड, चिरंजीव गद्देवार तसेच हरिओम कॉम्प्युटरच्या संचालिका सौ. दीपा भास्कर कायते उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. उदय थुल यांनी मागील २५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेताना MKCL ने डिजिटल शिक्षण, रोजगारक्षम कौशल्यविकास आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घडविलेली क्रांती अधोरेखित केली. “Transformation through Empowerment” या संकल्पनेमुळे लाखो विद्यार्थी व युवकांनी शिक्षण, रोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी मिळवल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्यांनीही आपल्या भाषणातून MKCL च्या समाजपरिवर्तनातील भूमिकेचा गौरव केला व विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साक्षरता यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला अमित बढई, भास्कर कायते, रेणुका कायते, कुंदन समरथ यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेणुका भास्कर कायते यांनी केले तर आभार चिरंजीव गद्देवार यांनी मानले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













