The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २१ : गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिसंवेदनशील विभागातील धानोरा तालुका अतंर्गत मुरुमगाव येथील अखिल भारतीय आदिवासी हलबा/हलबी समाज मुरुमगाव च्या वतीने सोमवार २० जानेवारी २०२५ रोज दरवर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा शिरोमणी सहीद गैदंसिहं बाऊ नायक याचा शहादत दिवसा निमित्ताने श्रध्दांजली अर्पित करुन दिवस साजरा करण्यात आला.
या काय॔क्रमाचे उदघाटक आरमोरी विधान सभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार रामदास मसराम तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनिराम रावटे माजी पंचायत समिती सभापती तर प्रमुख अतिथि म्हणून सरपंच शिवप्रसाद गवरना, काँग्रेस तालूका अध्यक्ष प्रशांत कोराम धानोरा, काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलींद खोब्रागडे आरमोरी, जावेद शेख, उपसरपंच मथनूराम मलीया ग्रामपंचायत मुरुमगाव, लताताई पूगांटे, सरपंच शेवंताताई हलामी ग्रामपंचायत पन्नेमारा, बैसाकूराम कोटपरिया, वसंत कोलियारा, लजैयलाल मार्गीया, मदनलाल बढई, रोशन कवाडकर, मूनिर शेख, शरीफ भाई कूरेशी, ओम देशमुखझ, नेगूंराम कोठवार, अजमन मायाराम राऊत, श्रीराम राऊत, माहारसिगं फरेदिया गौतम राणा, नकूल भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
या काय॔क्रमाची सुरुवात हलबा/हलबी समाज मन्दिर मुरुमगाव वरून कलश यात्रा काढण्यात आले व शिरोमणी सहीद गैदंशिहं व शहीद बिरसा मूडां याच्यां प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करुन ध्वजारोहण काय॔क्रम करण्यात आले.
प्रास्ताविक जिवनलाल गवरणा यांनी केला तर अजमन मायाराम राऊत यांनी मार्गदर्शन करीत असताना मुरुमगाव व परिसरातील विविध समस्येवर निवारण करण्याबाबत निवेदन आमदार रामदास मसराम यांना देण्यात आले व मुरुमगाव परिसरातील आदिवासी लोकांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र ५० टक्के आदिवासी बांधवसाठी पूरावा म्हणून p1 ,p9,किवा कोतवाल पंजी नसल्यास जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून शेकडो विद्यार्थी आणि शेतकरयांन समोर सकंट निर्माण झाले आहेत त्याचे निराकरण करण्यात यावे, आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक मार्फत हमी भावाचे धान्य खरेदी करण्यात यावे, अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना जबरन जोत चे पट्टे व 7/12 देण्यात यावे, शेतकरीवर्गा करीता विद्युत प्रवाह व विद्युत मिटर डिमाडं भरण्यास तात्काळ चालू करण्यात यावे,
आदिवासी विकास महामंडळाकडून १५ हजार क्षमतेनुसार गोडाऊन मुरुमगाव यथे देण्यात यावे, बेलगाव येथील आमदार फंडातून समाज मन्दिर बांधकाम करण्यात यावे, खासदार यांच्याकडून वाचनालय व ओपन व्यायाम शाळा साठी १,५०,००००/- देण्यात यावे, हलबा/हलबी समाज करीता टिना सेट व बोअरवेल देण्यात यावे, कू कचंन बरातू मार्गीया राहणार मूरूमगाव रामचंद्र दखने विद्यालय मुरुमगाव मध्ये कोरोना कळात वर्ग 10, 12 वि ची परीचछा दिलेला आहे परतूं अजून पर्यत गूणपत्रीका मिळाले नाही. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मुरुमगाव येथे वर्ग 11वी वर्ग 12वी चे विज्ञान व कला शाखा सूरू करण्यात यावे, मुरुमगाव येथे बी. बीए.बी.एस.सी.चे कॉलेज सूरू करण्यात यावे, मुरुमगाव ते औधीं, व तूमडीकसा हिरंगे, कूलभटी रोड काम खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, रेगांगाव, गोटाटोला, बेलगाव, पन्नेमारा सिदेंसूर, रिडवाही, उमरपाल, केहकावाही मसाद, कटेझरी ते चारवाही या रोड कामाचे निवेदनातून मागणी करण्यात आली.
या काय॔क्रमात आलेल्या सर्व उपस्थित नागरिकांना आमदार रामदास मसराम यांनी सर्व मागण्या घेऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. या काय॔क्रमात चे आयोजन अखिल भारतीय हलबा/हलबी समाज मुरुमगाव यांनी केला तर कार्यक्रम चे संचालन दुर्वास नाईक यांनी केले तर आभार बैसाकूराम कोटपरिया यांनी मानले.
