गडचिरोली : चारचाकी वाहनासह ३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त

127

The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : जिल्ह्यात दारूबंदी असताना छुप्या मार्गाने दारूची तस्करी तसेच विक्री केल्या जाते. असे असतानाही काही निडर हे दारूची वाहतूक करतांना कुरखेडा पोलिसांनी सापळा कारवाई करीत चारचाकी वाहनासह ३ लाख ४२ हजार ५०० रुपयांची दारू जपते केली. सदर कारवाई २० जानेवारी रोजी रात्रौ १०१ वाजता करण्यात आली. सदर प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरमोरीकडून वडसा मार्गे अवैध दारुची वाहतुक करणार आहे अशी गोपनीय माहिती वडसा पोलीस ठाण्याला मिळाली असता पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असता शंकरपूर येथून वाहन चालक हा पोलीसांना चकमा देवून कुरखेडाच्या दिशेने वेगाने पळून गेला. त्यानंतर सदर बाबत पो.नि. जगताप यांनी पोस्टे कुरखेडा येथील पो.नि.महेंद्र वाघ यांना माहिती दिली. सदर माहितीवरुन पोस्टे कुरखेडा येथील पो.नि. महेंद्र वाघ यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह गोठणगावाजवळ सापळा रचून बसले असता, रात्री १०.०० वा दरम्यान एक चारचाकी फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसली. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला हात दाखवून त्यास वाहन थांबविण्याचे प्रयत्न केले असता, वाहन चालक पोलीसांना हुलगावणी देवून भरधाव वेगाने पळून गेला. त्यानंतर सदर वाहनाचा पाठलाग करुन कढोली येथील तूकाराम विदयालयासमोर वाहनाला थांबविण्यात आले. त्यावेळी वाहन रस्त्यावर उभी करुन वाहन चालक अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळून गेला होता. दरम्यान सदर वाहन चालकाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात एकुण 25 पेटी देशी दारू टायगर ब्रॉन्ड संत्रा कंपनीचे 90 एम.एल. मापाच्या 95 नग निपा असे एकुण 2375 नग निपा किंमत अंदाजे १,४२,५००/- रु. मिळून आल्याने सदर अवैध दारु सहित एक चारचाकी फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहन क्र. एम. एच. ३१ सी. एन. ७१२० किंमत अंदाजे २,००,०००/- रु. असा एकुण ३,४२,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे कुरखेडा येथे कलम 65 (अ) महा. दा. का. सहकलम 184 मो.वा.का. अन्वये अज्ञान इसमा विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कुरखेडा पो. नि. महेंद्र वाघ, पोउपनि. दयानंद भोंबे, पोहवा/शेखलाल मडावी, पोअं/संदेश भैसारे, पोअं/नरसिंग कोरे, चासफौ/घागी, तसेच पोस्टे वडसा येथील पो.नि. अजय जगताप, सपोनि. मनीष गोडबोले, पोउपनि. चेतन परदेशी, पोहवा/राकेश डोनाडकर, पोअं/शैलेश तोरकपवार, पोअं/नितेश यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here