– आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली होती मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : गडचिरोली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात आले आहे.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी शासन स्तरावर केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) गडचिरोलीचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी ) गडचिरोली, जि. गडचिरोली करण्यात आले आहे. या प्रशिक्षण संस्थेचा नामकरण सोहळा उद्या ११ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
नामकरणाची मागणी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आभार मानले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #goviti #iti )













