सकाळच्या सुमारास फिरतांना व मोहफूल,तेंदूपत्ता संकलन करताना दक्षता घ्या : वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर

228

The गडविश्व
गडचिरोली, २२ मार्च : गडचिरोली जिल्ह्यात वाघ वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. अशातच ग्रामीण तसेच शहरी भागात उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक सकाळी फिरायला जातात. तसेच सकाळच्या सुमारास फिरतांना व मोहफूल, तेंदूपत्ता संकलन करताना दक्षता घ्यावी असे आवाहन वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी केले आहे.
मोहफूल संकलन हंगाम सुरू झाला आहे. जंगल परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता असते. मोहफुल व तेंदूपत्ता जास्त मिळावा, यासाठी ग्रामीण भागातील नागरिक पहाटेच्या अंधारातच जंगलात जातात. अशावेळी जंगल परिसरात योग्य ती काळजी न घेतल्यास जीविताचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोहफूल व तेंदूपत्ता संकलन करताना आजू बाजूला लक्ष ठेवावे. शक्य तोवर जास्त वेळ खाली वाकून मोहफूल गोळा करू नये, एकाने जमा करावे व दुसऱ्यांनी आजू बाजूला लक्ष ठेवावे, एकट्याने जंगलात जाऊ नये, तीन चारच्या गटाने आवाज करीत जावे, जंगलात चौफेर नजर असावी, स्त्रीने पुरुषाच्या सोबतीने जावे, वाघ काय करतो, मेलो तर घरच्यांना २० लाख मिळतात असा विचार करू नये, म्हातारे व कमजोर व्यक्तीने जंगलात जाणे टाळावे, वाघ जंगलात दिसल्यास सर्वांनी आरडाओरड करावे व तिथून निघून जावे, मलाच मोफफुले व तेंदूपत्ता मिळाले पाहिजेत म्हणून एकट्याने जंगलात सैरावैरा भटकू नये, तेंदूपत्ता झुडपात असेल तर सावध होऊनच त्या जवळ जावे, पाणवठ्या तलावाच्या जवळपास सावधगिरीने जावे तिथे वाघ असण्याची शक्यता आहे, तेंदुपत्ता, मोहफूल गोळा करण्याकरिता दिवस उजळल्यानंतरच जावे व दुपार होण्यापूर्वी परत यावे, कोणत्याही वन्यप्राण्याला इजा करू नये तो चौताळून इतर लोकांवर हल्ला करू शकते, जंगलात आग लावू नये त्याने वन्यप्राण्यांचे घर जळते व ते सैरावैरा पळून शेताकडे गावाकडे येतात, झाडे तोडणे, झाडावर चढणे टाळावे, मोहाच्या झाडाखालची जागा स्वच्छ करून घ्यावी पण आग लावू नये, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे व वनविभागाला सहकार्य करावे, तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळच्या सुमारास फिरायला जातांना उचीत सतर्कता बाळगावी असे आवाहन वन्यजीवप्रेमी तथा पीपल फॉर एनवोर्मेन्ट & एनिमल वेल्फेअर संस्थेचे सचिव अजय कुकडकर यांनी केले.

(The gadvishva) (The gdv) (gadchiroli news) (forest) (ajay kukadkar) (people for environment and animal welfare gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here