The गडविश्व
कोरची, २१ मार्च : येथील देवरी मार्गावर असलेल्या निर्मल टी पॉईंट हॉटेलवर कोरची पोलिसांनी धाड टाकून ६४ हजार ९०० रुपयांचा अवैध विदेशी दारू जप्त केल्याची कारवाई २० मार्च रोजी सकाळच्या सुमारास केली.
स्थानिक पोलीसांना देवरी या मुख्य मार्गावर असलेल्या निर्मल टी पॉईंट वर असलेल्या हॉटेल मध्ये दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून ६४ हजार ९०० रुपयांची विदेशी दारू पकडली आहे. यामध्ये रॉयल स्टेज कंपनीचे ५ बंपर, मॅगडोल नं. १०२ बंपर, लेमोन्ट प्रीमियम स्ट्राँग कंपनी बियर ३६ कॅन, मॅगडोल नं. १ कंपनी ५२ निप, गोवा व्हिस्की ५७ निप, रॉयल स्टेज कंपनी ४५ निप, लेमोन्ट प्रीमियम स्ट्राँग कंपनीचे बियरचे १२ बॉटल, ड्रिंक प्योर कंपनीच्या १ लिटर मापाच्या पाण्याने भरलेल्या सीलबंद प्लास्टिक बॉटल असा एकूण ६४ हजार नऊशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ ६५ (e), ८३ नुसार आरोपी निर्मल धमगाये, मुलगा तरुन धमगाये विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार असल्याची माहिती आहे. पुढील तपास कोरची पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी, पोहवा किशोर राऊत करीत आहेत.
(The Gadvishva) (The gdv) (Korchi) (Police) (Gadchiroli News updates)