The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २७ डिसेंबर : तालुक्यातील धानोरा ते मुरुमगाव महामार्गावरील येरकड नजीकच्या कोसूमटोला येथे तीन दुचाकींच्या झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाल्याची घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
प्रफुल विनोद तूलावी (३०) मूरमाडी, गुरुदेव मातलामी ( ४०) धानोरा, देवनाथ हलामी (१८) पन्नेमारा, आशिष आतला (१७) कूलभट्टि, निखिल मोदरू पेदोर (२५) मूरमाडी असे अपघातात जखमी झालेल्यांची नवे आहेत.
प्राप्त माहितीनुसार धानोरा मार्गे येरकडकडे जाणारी दुचाकी व येरकड येथून धानोराकडे येत असलेल्या दोन दुचाकी कुसुमटोला येथे समोरासमोर धडकल्या. या झालेल्या अपघात ५ जण जखमी झालेत. जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.
(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Salman Khan) (David Warner) (Steve Smith) (Sandeep Sharma) ( Chelsea vs Bournemouth ) (Road Accident) (DHanora)